आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू

 आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू



आंध्र प्रदेशात मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे विजियानगरममध्ये रविवारी दोन गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनमध्ये ही टक्कर झाली. बचावकार्य सुरू असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. याशिवाय एनडीआरएफच्या पथकांचीही मदत घेण्यात आली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने अपघाताची काही फोटो ट्विटवर शेअर केले हेत. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसून येते. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे
पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पीएमओने सांगितले की, अधिकारी जखमींना लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पंतप्रधानांनी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, अपघातस्थळी अंधार असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद घटनास्थळी पोहोचले आहेत. ते म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि अपघात निवारण गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीमही अपघातस्थळी रवाना झाली आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !