श्री पंडित पार्डिकर महाविद्यालयाचा मुलींचा संघ डॉ बामु विद्यापीठात सर्व प्रथम

 श्री पंडित पार्डिकर महाविद्यालयाचा मुलींचा संघ डॉ बामु विद्यापीठात सर्व प्रथम 




सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि शिवछञपती महविद्यालय, पचोड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ऑक्टोबर गुरूवार रोजी आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन शिवछञपती महविद्यालय, पाचोड येथे कऱण्यात आले होते. या स्पर्धेत सिरसाळा येथील श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने एस जी आर जी कॉलेज परांडा, ॲड हंबर्डे कॉलेज आष्टी व आनंदराव धोंडे कॉलेज कडा या बलाढ्य संघाना एक तर्फी हरवत प्रथम क्रमांक पटकावला. या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एकुण ०७ संघांनी सहभाग घेतला होता. या मुलींच्या संघास क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले, प्रा. दयानंद झिंजूर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुलींच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, डॉ ए डी टेकाळे, डॉ विठ्ठल भोसले, प्रा. दयानंद झिंजूर्डे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार