सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे

सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे



गेवराई:- गेवराई शहरात शांततामय वातावरणात चालू असलेल्या सकल मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महाशिखर परिषद चे तालुका संघटक यांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे अध्यक्ष सचिन वाडे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दडके यांच्या सहमतीने व गेवराई शहरातील ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे कार्यकर्ते व व इतर सकल ब्राह्मण यांच्या मागणीनुसार गेवराई शहरातील सकल मराठा आरक्षण आंदोलनास प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा दिलेला आहे

   सकल मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून शांततामय वातावरणात आंदोलन मोर्चेकरीत आहेत तरी शासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही तरी सकल मराठा समाजाचा प्रश्न शासनाने तात्काळ सोडविण्यात यावा तसेच उपोषणास बसलेल्या समाज बांधवास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

    या निवेदनावर ब्राह्मण महा शिखर परिषद भारत तालुका संघटक अनिल बोर्डे श्रीकृष्ण मुळे अशोक देऊळगावकर जगन्नाथराव जोशी विश्वास चपळगावकर चंद्रकांत बोर्डे भास्कर अंबादास जोशी एस व्ही देशपांडे विनायक देशपांडे वैभव जोशी रेणुक दास डाफणे सचिन जोशी राजेश जोशी आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार