ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे

 ■ ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे


परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

 

      परळी वैजनाथ  तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  26 सप्टेंबर 2023 रोजी बांधकाम कामगारांबाबत काढलेले पत्र ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर  कायमस्वरूपी लावावे अशी लेखी सुचना काढावी अशी मागणी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्याकडे केली आहे.


          26 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकास काढलेल्या पत्रात ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना काम केल्याची खात्री करून घेऊन मागील वर्षात 90 दिवस किंवा  जास्त दिवस काम केल्याचे पत्र मंडळास नोंदणीसाठी द्यावे असा आदेश दिला आहे. कामगाराने गुतेदाराकडे 90 दिवस  काम केल्याचे प्रमाणपत्राची गरज नाही. रोज वेगळ्या मालकाकडे काम करावे  लागत असलेल्या बांधकाम कामगारास ग्रामीण भागात ग्रामसेवकाने प्रमाणपत्र द्यावे. असा सी.ओ.च्या पत्राचा स्पष्ट अर्थ असूनही ग्रामसेवक अनावश्यक कागदपत्राची कामगारांना मागणी करतात व कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे सांगतात . ग्रामसेवकाच्या असहकार्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना खऱ्या सामान्य बांधकाम कामगाराकडे पोचली नाही. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास सुचना दिल्या आहेत व गटविकास अधिका-यांनीही सुचना दिल्या आहेत. तरीही ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाहीत. 


         ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राची माहिती व्हावी म्हणून ते पत्र ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या नोटिस बोर्डवर कायमचे लावून सांभाळले पाहिजे अशी मागणी प्रा. बी.जी.खाडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार