इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शांतता राखा : शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचे आवाहन

 उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक



बीड, प्रतिनिधी......
         बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. ३१.१०.२०२३ रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.

                 मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण अंतरवली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथे सुरू केलेले आहे. उपोषणादरम्यान त्यांची आज रोजी प्रकृती खालवली असल्याचे सूत्रांकडून समजलेले आहे.या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्याने, व काही समाजकंटक मराठा समाजाच्या नावाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण आंदोलन भरकटावे आंदोलनास हिंसक वळण लागावे या दुषित हेतूने काही लोक मराठा आंदोलनाच्या नावावर जाळपोळ व हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी तसेच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये व शांततेच्या मार्गाने चाललेले मराठा आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे चालावे, या हेतूने मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्हा बंद ची हाक देऊन बंदला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन सदरचा बंद शांततेत
लोकशाहीच्या मार्गाने यशस्वी करावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने  करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!