परळीत दिव्यांग बांधवांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमुळे मिळाला लाख मोलाचा आधार!

वंचितांसाठी काम करण्याचे संस्कारच समाजोपयोगी कार्यासाठी ऊर्जा देतात - खा. प्रितम मुंडे

पूर्व तपासणी शिबिरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना  साहित्याचे मोफत वितरण

परळी वैजनाथ।दिनांक २०।
वंचित, पिडितांची सेवा करण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, हेच संस्कार आम्हाला समाजोपयोगी काम करण्याची उर्जा देतात. तथापि, राजकारणातील व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मला 'पांढऱ्या पेशी' व्हायला आवडेल असं खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी येथे सांगितले.

   केंद्र सरकारचा सामाजिक कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आम्ही पूर्व तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना त्यांचे जीवन कष्टमुक्त करणारे सहाय्यक साधने वाटप करताना आनंद होतो आहे. केंद्र सरकारच्या कंपनीकडून दिव्यांगांसाठी चांगले दर्जेदार आणि टिकावू साहित्य मिळाले आहे. यामुळे दिव्यांग लोकांचा दैनंदिन जीवनातील संघर्ष कमी होईल.
जेंव्हा आम्ही जिल्ह्यासाठी समर्पित भावनेने काम केले तेंव्हा तेंव्हा लोकांनीही आम्हाला त्याची पोचपावती दिली. प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला लोकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिल आहे. यात कुठेही राजकारण अथवा मतपेटी डोळ्यासमोर ठेवून राजकारण केल नाही असं त्या म्हणाल्या.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे दिव्यांगांना सन्मान मिळाला आहे, दिव्यांग व्यक्ती म्हणजे एका विशिष्ट आणि दिव्यशक्तीने आपल दैनंदिन जीवन जगत असतात, त्यांच्या या शक्तीला समर्पक नाव देऊन मोदीनी त्यांचा सन्मान केला असल्याचे खा. प्रितमताई म्हणाल्या.

दिव्यांगांना लाख मोलाचा आधार 
---------
या कार्यक्रमास गोरख मस्के, परशुराम टापके, सरताज खान, मीनाताई ठाकूर, विजय कोटरलवार, सूर्यकांत कुल्हाटे, अनिता शेरकर, सय्यद खान मेहताब खान आदी दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणांचे प्रातिनिधिक स्वरूपात निःशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. पूर्व तपासणी शिबीरात सुमारे २२५ लाभार्थी पात्र ठरले आहेत, त्यांना विविध साहित्य वितरीत करण्यात आले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन राबविलेला हा उपक्रम दिव्यांगांसाठी लाख मोलाचा आधार ठरला.

   कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डाॅ. हरिश्चंद्र वंगे, उप जिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ अरूण गुट्टे, उत्तमराव माने, दत्ता कुलकर्णी, नारायण सातपुते, राजाभाऊ दहिवाळ, डाॅ. शालिनीताई कराड, रेशीमनाना कावळे, शेख अब्दुल करीम, विलास मुंडे आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. अजय गिते व ज्ञानोबा सुरवसे यांनी केले.
••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !