दसरा मेळाव्यात पंकजाताईंकडे करणार सुपूर्द

 वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मदतीसाठी कासेवाडीकरांनी जमवली सात लाखांची लोकवर्गणी 



दसरा मेळाव्यात पंकजाताईंकडे करणार सुपूर्द 


आष्टी, दि. 2 :-  स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. ज्या पक्षात पंकजाताई मुंडे आहेत त्याच पक्षाचे राज्यात केंद्रात सरकार आहे. असे असतांना  सरकारने आर्थिक अडचणीत वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत केली नाही. राज्यातील इतर साखर कारखान्यांना मदत केली ऐवढेच नाही तर जिएसटी थकवल्या प्रकरणी वैद्यनाथ कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केली व कारखान्याचा किंमती वस्तु जप्त केल्या. कारखान्याला आर्थिक मदत म्हणुन दि. 2 ऑक्टोबर रोजी कासेवाडी ता. आष्टी जि. बीड येथिल उस तोड कामगारांनी एकञ येत 7 लाख 20 हजार रूपयांची वर्गणी गोळा केली असुन ही वर्गणी सावरगावघाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

      विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप पक्षाने पंकजाताई मुंडे यांना अनेक वेळा डावलले असुन त्यांना राज्यात विधान परिषदे किंवा इतर मोठ्या पदावर घेतले नाही. पराभूत झालेल्या अनेकांना पक्षाने संधी देऊन राजकिय बळ दिले तर दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांचे राजकिय पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला. राज्यातील राजकारणातून त्यांना दुर ठेवले गेले. असा आरोप पंकजाताई मुंडे यांचे समर्थक करत आहेत. दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी गेल्या महिन्यात शिवशक्ती याञा काढली. या याञेत त्यांनी पक्षाचे कोणतेही बॅनर वापरले नाही तरी देखील या याञेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या याञेच्या काही दिवसांनंतर वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाली त्यामुळे पंकजाताई मुंडे समर्थक पुन्हा पेटून उठले आहेत. याचाच एक भाग म्हणून कासेवाडी ता. आष्टी जि. बीड येथिल उसतोड कामगारांनी एकञ येत 7 लाख 20 हजार रूपयांची वर्गणी गोळा केली आहे. ही रक्कम फक्त शंभर घरे असलेल्या छोट्या वाडीतून जमा करण्यात आली आहे. ही रक्कम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी उभ्या केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यांसाठी देण्यात येणार आहे. सावरगाव घाट येथे संपन्न होणाऱ्या दसरा मेळाव्यात ही रक्कम पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !