धनंजय मुंडेंच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनास निर्देश

 माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा अंत्यविधी उद्या शासकीय इतमामात होणार


धनंजय मुंडेंच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनास निर्देश


मुंबई (दि. 27) - माजी केंद्रीय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार कै. बबनराव ढाकणे यांचे आज सकाळी निधन झाले असून उद्या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनास दिले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे व दूरध्वनीवरून संपर्क करून विनंती केली होती. 


माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज सकाळी 10 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 


बीड जिल्ह्याचे खासदार, केंद्रात मंत्री, राज्यात कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, विधानसभा उपाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. उद्या दि. 28 रोजी त्यांचे मूळ गाव पागोरी पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


कै.बबनराव ढाकणे यांचे देश व राज्याच्या प्रति दिलेले योगदान विचारात घेऊन त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे व दूरध्वनीवरून केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती विनंती मान्य करत कै. बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबत अहमदनगर जिल्हा प्रशासनास निर्देश दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !