दीपक रणनवरे यांनी दिली माहिती

 समस्त ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण

जालना- (प्रतिनिधी)

शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत नोव्हेंबर महिन्यात मागण्या मान्य होईपर्यंत जालना येथे दीपक रणनवरे  हे आमरण उपोषण करणार. अशी माहिती समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे  मुख्य समन्वयक दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी यांनी कळविले आहे .


*ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.*

 *उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे.*

 *प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. व परशुराम भुवन उभारण्यात यावे* 

*पौरोहित्य करणाऱ्या बंधूना दर महा 5000 मानधन देण्यात यावे*

 यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज  समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात  सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले,परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बद्ल बोलले नाही.या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने समस्त ब्राह्मण समाज  समिती च्यावतीने नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण करणार आहे ही सर्व माहिती प्रत्येक गावात देऊन  समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्य भर,  बैठकांचे आयोजन करुन उपोषणा बदल माहिती देण्यात येणार आहे. हि माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे  धनंजय कुलकर्णी सौ. विजया कुलकर्णी श्रीकांत जोशी  संजय देशपांडे महेश अकोलकर,शाम कुलकर्णी  योगेश जानतीकर  डॉ संजय रुईखेडकर  अजिंक्य पांडव मंदार कुलकर्णी, आलोक चौधरी, अनिल डोईफोडे,दत्ता महाजन गणेश लंके प्रसन्ना कुलकर्णी  सुशिल कुलकर्णी पंकज कुलकर्णी बाबासाहेब कुलकर्णी विनायक कुलकर्णी विनायक अहंकारी, प्रमोद कुलकर्णी  इंद्रजित इनामदार मधुसूदन दंडारे हे सर्व महाराष्ट्रात महीती देणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार