स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या मित्राला धनंजय मुंडेंनी दिली पुन्हा संधी!

 स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या मित्राला धनंजय मुंडेंनी दिली पुन्हा संधी!



पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती


पाशा पटेल यांची नियुक्ती म्हणजे माझी त्यांना गुरुदक्षिणा - धनंजय मुंडे


मुंबई (दि. 18) - माजी आमदार तथा स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात ओळख असलेले शेतकरी नेते पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. पाशा पटेल यांच्या माध्यमातून स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.


पाशा पटेल हे याआधीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार  म्हणून त्यांची ओळख आहे.


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात व पाशा पटेल यांच्या मध्ये कायमच गुरू - शिष्याचे नाते आजवर राहिलेले आहे. पाशा पटेल यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतेच औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात बोलून दाखवले होते. दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


पाशा पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवड, बांबूवरील संशोधन तसेच बांबू पासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !