चि.सूर्या सचिन सौंदळे याने सिकंद्राबाद येथील सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकावले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

   ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने सिकंद्राबाद येथील सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धा 2023 च्या स्पर्धेत कास्य(ब्राँझ) पदक पटकावले आहे.

  10 वे सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धा-2023 चे आयोजन दि.18 अॉक्टों ते दि. 20 अॉक्टों 2023 दरम्यान दिल्ली पब्लीक स्कूल,नचाराम,सिकंद्राबाद येथे करण्यात आले होते.

  चि.सूर्या याने यापूर्वी बेंगलुरू येथील 17व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप मधून गोल्ड मेडल प्राप्त केले होते.

  चि.सूर्या हा छत्रपती संभाजीनगर मधील वुडरिज हायस्कुल शाळेत पाचवीत शिक्षण घेत असून परळी-वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचा पुतण्या आहे.जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल चि.सूर्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !