ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार

 परळी वैजनाथ तालुक्यातील संगांयो, इंगांयो, श्रावण बाळ, निराधार लाभार्थी यांची दिवाळी होणार गोड : डॉ. संतोष मुंडे




ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार

लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा


आता लाभार्थ्यांना 1000 नाही तर 1500 रुपये दरमहा मिळणार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना अंतर्गत असलेल्या निराधारांची यंदा दिवाळी गोड होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.

एकूण 24436 लाभार्थ्यांचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्याचे अनुदान थकीत होते. त्यासाठी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. अखेर 26 ऑक्टोबर रोजी सर्व लाभार्थी यांना मिळणारी एकूण अनुदान रक्कम रु 10,85,79,600/एवढी बँकेत तहसील कार्यालयाने जमा केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला 1000/रु ऐवजी 1500/रु महिना प्रमाणे अनुदान मिळणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी पैसे उचलता येतील.  या दिलास्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार मानत अभिनंदन केल्याची माहिती दिव्यांग मंत्रालयाच्या अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार