शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनावर काय बोलले?

 महाराष्ट्रात वणवा पेटेल अशी स्थिती -शरद पवार



महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा उग्र बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आंदोलक आक्रमक होताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. पण, लांबवला आणि आता महाराष्ट्रात वणवा पेटेल की, काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. यावेळी पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचाही उल्लेख केलामुंबईत राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शरद पवारांनी दोन तीन मुद्द्यांवर भूमिका मांडली. यात एक मुद्दा होता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आरक्षण. या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवलं.

शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनावर काय बोलले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख आता केला आणि ज्या कामासाठी पक्षाचे अध्यक्ष (जयंत पाटील) आता गव्हर्नरांकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न. यापूर्वी चर्चा झाली होती व निर्णय सुद्धा घेतला होता. दुर्दैवाने कोर्टामध्ये वेगळी भूमिका ही घेतली गेली आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची इच्छा होती. आज त्या संबंधी उपोषण जालना जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांनी केलं."

महाराष्ट्रात वणवा पेटेल अशी स्थिती -शरद पवार
       शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, "मी स्वतः पहिल्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. त्यांच्या मागण्या काय ते समजून घेतलं. त्यातून मार्ग कसा काढता येईल? त्या संबंधी विचारविनिमय केला. दुर्दैवाने राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने काही निकाल घ्यायची आवश्यकता होती ती लांबवली. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वणवा पेटेल की काय या प्रकारची एक स्थिती निर्माण झाली", अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.
           "पक्ष म्हणून सुद्धा स्वच्छ भूमिका आहे की जे काही जरांगे पाटील करत आहेत, जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. ती करत असताना दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातून काही आपल्याला काढून घ्यायचं नाही. त्यांच्या ताटातलं आहे ते तिथेच राहिलं पाहिजे. आज जी काही मागणी या मराठा समाजाने केलेली आहे त्याची पूर्तता ही योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे", अशी भूमिका शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !