परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

एसटीच्या सेवानिवृत्त दोघा चालकांचा वडखेल ग्रामस्थांनी केला सत्कार

 एसटीच्या सेवानिवृत्त दोघा चालकांचा वडखेल ग्रामस्थांनी केला सत्कार


नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांची होती प्रमुख उपस्थिती 

परळी/प्रतिनिधी

     एसटी महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या दोघा एसटी चालकांचा वडखेल येथील ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला आहे. सोमवारी (ता.९) सायंकाळी गावात झालेल्या सत्कारानी दोघेही चालक भाराऊन गेले होते. 

      माजलगाव आगारातुन अशोक देवकते व परळी आगारातुन माणिक बोराडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती च्या निमीत्ताने त्यांच मुळ गाव असलेल्या वडखेल येथील गावकऱ्यांनी परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी तथा पत्रकार ह भ प शामसुंदर सोन्नर महाराज हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते मराठवाडा साथी चे निवासी संपादक प्रकाश चव्हाण, मा. सरपंच सुर्यकांत (पिंटु) देवकते, आंगद गंगणे, अंबाजोगाई आगारातील चालक श्री उबाळे, माउली आगलावे, नामदेव आगलावे, चंद्रसेन देवकते, वसंत खरात भिमराव आगलावे, विश्र्वांभर सोन्नर, अनुरथ खरात, सुंदर बोराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकते यांनी केले. सुत्रसंचलन अनिल पांचाळ सर यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर देवकते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण देवकते, अविनाश चव्हाण, गोपाळ बिडगर, गणेश सोन्नर, सतिष देवकते, सोमेश्वर चौधरी, महारुद्र देवकते, मोहन देवकते आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!