संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

 वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

           वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग परळी वै येथे आज दिनांक १०/१०/२०२३ रोजी डॉ. सूर्यकांत मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन, विद्यार्थी व शिक्षकवृन्द यांच्या सहभागाने उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित पोस्टर प्रेझेन्टेशन सेमिनार, नाटक विद्यार्थी व शिक्षक वृन्दानी सादरर केले. यात बि.एस. सी नर्सिंग तृतीय वर्ष व फिजिओथेरपी च्या विद्यार्थ्यांनी मानसिक रूग्ण, त्यांची होणारी विटंबना, मंत्र, जादूटोना, मांत्रिक यांचा घेण्यात येणारा अघोरी उपचार हे सर्व अतिशय बोलक्या अभिनयाने सादर केले  प्रशांत सांगळे सरांनी स्कीप्ट लिहिली त्यांना  सतीष सर व  राम होळंबे सरांचे मार्गदर्शन लाभले. प्रशासकीय अधिकारी  शेख सर, प्राचार्या सौ. गुणप्रिया चोपडे, साद कामिल सर व सर्व शिक्षक वृन्दांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले श्रीमती ताई परळीकर मॅडम नर्सिंग अँडव्हायझर यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....