तेली समाज दांडिया महोत्सवात झाली जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती

 तेली समाज दांडिया महोत्सवात झाली जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती 


परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)

          येथील तेली समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (ता.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी संयोजकांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

    येथील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षापासून सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या दांडिया महोत्सवाचे दुसरे वर्षे आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी संयोजक युवानेते पवन फुटके,शिवशंकर जठार, अतुल बेंडे यांच्या वतीने अजयजी मुंडे यांचे शाल,पुष्पहार, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. दांडियाच्या पाचव्या दिवशी महिलांसाठी राजस्थानी लुक दांडिया या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महिलांसाठी सोन्याची नथ, स्मार्ट वाँच सह आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेस महिल़ाचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महिलांना कोणतीही प्रवेश फिस ठेवण्यात आलेली नसून संपूर्ण मोफत प्रवेश आहे. यामध्ये अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांचा महिलांनी आनंद घेतला. स्पर्धेचे बक्षीस वितरण शेवटच्या दिवशी सौ.राजश्री धनंजय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच आठ दिवस सहभागी महिलांना विशेष सरप्राईज बक्षीस संयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे.  उर्वरित स्पर्धेस महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दांडियाचे संयोजक युवानेते पवन फुटके व समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दांडियासाठी राधाताई फकिरे विशेष परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !