पुरस्कार आणखी जोमाने सामजिक कार्य करण्याची उमेद देणारा- भैय्या

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्डने बाजीराव भैय्या धर्माधिकारी सन्मानित


हा पुरस्कार आणखी जोमाने सामजिक कार्य करण्याची उमेद देणारा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी


 प.बंगालमधिल सिलीगुडी येथे देशभरातील निवडक सेवासमर्पित व्यक्तिमत्त्वांचा गौरव


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          भारतीय कर्मचारी मजदुर युनियन,नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी ११ ऑक्टोबर हा दिवस "सामाजिक समानता दिवस" म्हणून भारताच्या विविध भागात साजरा केला जातो.आज पाचवी राष्ट्रीय परिषद "सिलिगुडी,दार्जिलिंग" पश्चिम बंगाल मध्ये आयोजित करण्यात आली होती या कॉन्फरन्स मध्ये भारतीय कर्मचारी मजदुर युनियन द्वारा  "भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम नॅशनल एक्सीलन्सी अवॉर्डने परळीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात सातत्याने सामाजिक अभिसरण व सामाजिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अग्रेसर राहत कार्यरत असलेले व सामाजिक  समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम व योगदान देणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.

        भारतातून विविध राज्यातील नानाविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा गौरव दरवर्षी केला जातो.११ ऑक्टोबर १९१६ रोजी विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" येथे प्रवेश घेतला होता त्या सुवर्णदिवसाची आठवण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली म्हणून दरवर्षी ही राष्ट्रीय कॉन्फरन्स आयोजित केली जाते.या वर्षीच्या या बहुमानासाठी सामाजिक अभिसरण व सामाजिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अग्रेसर राहत कार्यरत असलेले व सामाजिक  समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम व योगदान देणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली होती. दार्जिलिंग सारख्या दुर्गम डोंगराळ भागात आयोजन होवून देखील आजच्या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. आसाम, सिक्कीम, बिहार,नेपाळ, थायलंड येथून अनेक मान्यवर व पुरस्कार विजेते यावेळी एकत्रित आले होते. खऱ्या अर्थाने या सोहळ्यात विविधतेतून एकता जपणाऱ्या आपल्या भारताच्या एकतेचे दर्शन घडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता इंडीयन ऑईलचे निवृत्त अभियंता सुजित सिंग आणि भारतीय कर्मचारी मजदुर युनियनच्या सिलिगुडी येथील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


हा पुरस्कार आणखी जोमाने सामजिक कार्य करण्याची उमेद देणारा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी


               या सोहळ्यातील पुरस्कारप्राप्त प्रत्येक महानुभावांच्या कार्याचा प्रकाश दिपवून सोडणारा आहे.या पुरस्कारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कार्य बघून आपण किती लहान आहोत याची अनुभूती येते.आजचा पुरस्कार माझ्यासाठी अजून जास्त जोमाने सामजिक कार्य करण्याची उमेद देणारा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार