खोटा धनादेश प्रकरणी अपील फेटाळले

 खोटा धनादेश प्रकरणी  अपील फेटाळले;आरोपीची सहा महिन्यासाठी थेट तुरुंगात रवानगी !



परळी वै : 

 खोटा धनादेश प्रकरणी परळी न्यायालयाचा आरोपीस सहा महिने तुरूंगवास व रू 9 80 000 दंडाची शिक्षा ठोठावली होती ती शिक्षा अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालयाने कायम ठेवली असुन आरोपीचे अपील फेटाळुन लावले व आरोपीस तात्काळ ताब्यात  घेऊन बीड येथील तुरुंगात रवानगी केली.

थोडक्यात हकीकत अशी की इंदपवाडी ता परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम शेषेराव मुंडे यांच्याकडुन पुणे येथील हरिओम एन्टरप्रायजेस या दाळ मिलचा मालक आरोपी नामदेव लक्ष्मण हरगुडे यांनी दिनांक.06.02.2015 रोजी आर टी जी एस मार्फत  9 50 000 रुपये तीन महिन्यांकरिता हात उसणे घेतले होते.सदर  वेळोवेळी मागणी केली असता आरोपी नामदेव लक्ष्मण हरगुडे यांनी दिनांक 06.01.2016 रोजीचा बँक ऑफ बडोदा या बँकेचा रू. 9 50 000  चा धनादेश दिला होता.सदर धनादेश न वटल्यामुळे फिर्यादी उत्तम शेषेराव मुंडे यांनी अँड आर व्ही गित्ते यांच्यामार्फत परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.सदर प्रकरणात साक्षीपुरावा होऊन आरोपीस उपरोक्त शिक्षा ठोठावली होती.

सदर शिक्षेच्या नाराजीने आरोपीने अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय येथे अपील केले होते.अंबाजोगाई येथील सञ न्यायालयात युक्तीवाद होऊन आरोपीचे अपील फेटाळुन लावले व परळी न्यायालयाचा निकाल कायम केला व आरोपीला तात्काळ पोलीसांनी ताब्यात घेऊन बीड येथील तुरंगात थेट रवानगी केली.फिर्यादीच्या वतीने अँड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर व अँड.पि.एन. कंगळे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार