परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सागर कुकडे याने क्रीडा क्षेत्रात परळीचा नावलौकिक वाढवावा -अभयकुमार ठक्कर
शिवसेनेच्या वतीने सागर कुकडे यांचा सत्कार संपन्न
परळी/प्रतिनिधी
सागर संजय कुकडे यांना क्रीडा क्षेत्रात परळीचा नावलौकिक वाढवून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत परळीचे नाव राज्यभरात पोहचवावे असे प्रतिपादन शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी केले.
सागर संजय कुकडे यांना लोहा येथील शिवाजीरावा वाकडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा विभागीय स्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार परळी येथील हनुमान व्यायाम शाळेचा मल्ल सागर संजय कुकडे यांचा परळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मंगळवार दि.10 ऑक्टोबर रोजी शाल, श्रीफळ, पुष्पहार व भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, माजी शहरप्रमुख नागनाथ पवार, माजी उपशहरप्रमुख सतिश जगताप, माजी शहर संघटक संजय कुकडे, छ.शिवाजी महाराज चौक विभागप्रमुख संजय सोमाणे, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, मनिष जोशी, सचिन लोढा, वैजनाथ शिंदे, शुभम कुलकर्णी, भारत गिराम यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा