सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता व थकीत रक्कम द्या

 सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता व थकीत रक्कम द्या: 8 नोव्हेंबर पासून नगर परिषद  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन




परळी वैजनाथ  : परळी नगरपरिषदेत सेवानिवृत कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 7 व्या वेतन फरकाचा दुसरा हप्ता व इतर थकीत मिळण्यासाठी दि. 8 नोव्हेंबर 2023 पासून नगर परिषदेपूढे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे व सरचिटणीस जगन्नाथ शहाणे यांनी सांगितले आहे.     

        महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांनी नगरपालीका सेवानिवृत कर्मचा-यांना 7 व्या वेतन फरकाने तीन हप्ते दिले आहेत परंतु परळी नगर परिषदेने फक्त पहिला व तिसरा हप्ता दिलेला आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवाउपदान व रजा रोखीकरणाची रक्कम दिलेली नाही. या सेवा उपदान व रजा रोखीकरणा ची रक्कम  मिळावी  म्हणून अनेक वेळा सेवानिवृत कर्मचारी संघटनेने आंदोलने केली. प्रत्येक वेळी लेखी आश्वासनेच मिळाली आहेत. दिपवाळीच्या सणासाठी सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत येणे व सातव्या वेतनाच्या फरकापैकीचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून दि 26 ऑक्टोबर 23 रोजी सह्यांचे निवेदन दिले आहे. जर दिनांक 7 नोव्हे 23 पर्यंत सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता व थकीत येणे  मिळाले नाही तर सेवानिवृत कर्मचारी संघटनेच्या वतिने दि 8 नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार