तेली समाज दांडिया महोत्सवास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद

तेली समाज दांडिया महोत्सवास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद




परळी वैजनाथ दि.१८ (प्रतिनिधी)

          येथील तेली समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (ता.१८) तिसऱ्याही दिवशी महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.श्रध्दा हालगे, सुजाता फुटके यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.

    येथील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षापासून सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या दांडिया महोत्सवाचे दुसरे वर्षे आहे. दांडियाच्या तिसऱ्याही दिवशी महिलांसाठी डान्स दांडिया या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महिलांसाठी तीन आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेस महिल़ाचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महिलांना कोणतीही प्रवेश फिस ठेवण्यात आलेली नसून संपूर्ण मोफत प्रवेश आहे. यामध्ये अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांचा महिलांनी आनंद घेतला. स्पर्धेचे बक्षीस वितरण शेवटच्या दिवशी सौ.राजर्षी धनंजय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच आठ दिवस सहभागी महिलांना विशेष सरप्राईज बक्षीस संयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे.  उर्वरित स्पर्धेस महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दांडियाचे संयोजक युवानेते पवन फुटके व समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दांडियासाठी राधाताई फकिरे विशेष परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार