परळी तालुकास्तरीय कलाविष्कार २०२३ स्पर्धा :प्रथम क्रमांक आलेले स्पर्धक/संघ जिल्हास्तरावर जाणार

 परळी तालुकास्तरीय कलाविष्कार २०२३ स्पर्धा :प्रथम क्रमांक आलेले स्पर्धक/संघ जिल्हास्तरावर जाणार


परळी /प्रतिनीधी

ग्रामीण भागातील जि.प.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कलाविष्कार २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिला तालुकास्तरीय टप्पा गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वै. येथे दिनांक  १९ व २० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.यामधे एकपात्री अभिनय, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गीत गायन, वैयक्तिक गीत गायन अशा स्पर्धांचा समावेश होता.

गटशिक्षणाधिकारी श्रीराम कणाके  यांच्या मार्गदर्शनखाली ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी गोविंद कराड, ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती हिना अन्सारी, केंद्रप्रमुख कुंडलिक गुहाडे , साधनव्यक्ती अशोक कराड, विजय कचरे, परमेश्वर दहिफळे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते.

स्पर्धेचा निकाल - 

एकपात्री अभिनय

प्रथम - कु. पठाण खुशी कलीम -जि.प. कें.प्रा.शाळा सिरसाळ 

द्वितीय -  द्वितीय कु.शेळके आरती यशवंत  जि.प.प्रा.शा. कावळेवाडी. तृतीय - सिद्धी उमेश निलंगे संस्कार प्रा शा परळी व कावळे वैष्णवी सूर्यकांत जि .प. प्रा शा कावळेवाडी 

वैयक्तिक नृत्य -

प्रथम - रुही बडे  जि.प.प्रा.शा.संगम

द्वितीय - ईश्वरी गुट्टे जि. प प्रा शाळा कासारवाडी. 

तृतीय - मानसी गिते जि.प.प्रा शा. वागबेट

समूह नृत्य -

प्रथम-जि.प.मा.शा.पोहनेर

द्वितीय -जि प प्रा शा कासरवाडी

तृतीय-जि.प.के.प्रा.शा.सिरसाळा

वैयक्तिक गायन -

प्रथम - समर्थ भांगे जि.प.प्रा.शाळा टोकवाडी

द्वितीय - सई गायकवाड संस्कार प्रा.शाळा परळी. तृतीय स्नेहल मस्के जि.प.प्रा.शा.संगम 

समूह गायन -

प्रथम - जि. प. के प्रा.शाळा सिरसाळा

द्वितीय - जि. प. मा. शा. पोहणेर

 वरील विजयी संघ व स्पर्धकांना गटसाधन कार्यालय पंचायत समिती परळी वतीने गटविकास अधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार असून प्रथम क्रमांक आलेले स्पर्धक/संघ जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार असून जिल्हास्तरावर दिनांक २७ व २८ ऑक्टोबर रोजी स्पर्धा होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके यांनी दिली तसेच त्यांनी सर्व विजयी संघ व स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !