आणखी एका ज्येष्ठ आमदारांचा राजीनामा

 मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षण:आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिला राजीनामा



              पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आज आपला राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात मराठा ,मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आपण राजीनामा देत असून आपला राजीनामा स्वीकृत करावा अशा प्रकारची विनंती आमदार सुरेश वरपूडकर यांनी केली आहे.
            मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी सर्वस्वी पाठिंबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे.तसेच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे, त्याची दखल न घेता धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. धनगर समाजास उपेक्षित प्रवर्गातील आरक्षण जाहीर करावे.त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवाना सुध्दा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या प्रवर्गात आरक्षणाची गरज आहे. ते आरक्षण मुस्लीम समाजास देण्यात यावे. वरील मागण्यांसाठी मी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे वरपूडकर यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !