पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे....

 आता लोकांच्या संयमाची परिसीमा झाली: माझी आईची भुमिका; लेकरांच्या हिताचा विचार करणे परमकर्तव्य - पंकजा मुंडे

आता मी घरी बसणार नाही, तुम्हांला मी मैदानात दिसेल : पंकजा मुंडे

 तुम्हांला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार : पंकजा मुंडे

भगवान भक्तीगड, सावरगांवघाट .....

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे....

        छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये माझं सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं. मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या, माळी लोकांनी माझं स्वागत केलं. या दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दीचं सीमोल्लंघन केलं. यासाठी सर्वांचे आभार. मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली, तेव्हा मला वाटलं नव्हतं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल. शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचं काम माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केलं आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे हे उपकार मला फेडता येणार नाहीत. माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात 11 कोटी जमा केले. मला पैसे नको केवळ आशीर्वाद कायम ठेवा.तुम्ही उन्हात बसलात, म्हणून स्टेजवरचे सुद्धा उन्हात आणि मी सुद्ध उन्हात आहे.मी लोकांचे पैसे घेतले नाही, माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत. तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही, असे मी मझ्या मुलाला सांगितलं. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. जिंकण्यासाठी आपण आपली नितिमत्ता, निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. राजकारणात माझ्या लोकांचे हित बघणे माझे परम कर्तव्य आहे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही असे पंकजाताई मुंडे यांनी निक्षून सांगितले.

            पुढे बोलतांना पंकजाताई यांनी सांगितले की,माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरले असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम कधी केले नाही आणि कधी मी करणार नाही.काम करताना निवडणुकीत मी पडले. पाय मोडला तर, कुबड्या घेऊन चालावं लागतं. राजकारणात एकतर पक्षाच्या कुबड्या घ्याव्या लागतात नाहीतर जनतेच्या ;मला माझ्या लोकांनी कुबड्या दिल्या आणि पराभवानंतर काही दिवसांतच मी मॅरेथॉन धावण्यासाठी तयार झाले.आज महाराष्ट्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना या सरकारकडून आणि नेत्यांकडून समाजाची खूप अपेक्षा आहे.या अपेक्षांचा भंग होणं आता जनतेला सहन होणार नाही.मी सरकारमध्ये मंत्री असतांना सर्वांसाठी काम केलं. कधी जात पाहीलं नाही, धर्म पाळला नाही, फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातील रक्त. आज जातीपातीच्या भिंती उभ्या राहत आहेत.महाराष्ट्रात समन्वयाची भुमिका घेऊन चालेल असं नेतृत्व आणि स्थिरता गरजेची आहे असे त्यांनी सांगितले.

       यावेळी आपल्या समर्थकांना अश्वस्त करत  पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की,दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो.ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचं भागतं.  पद न घेता निष्ठा काय असते, या सामान्य लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू. ज्या ठिकाणी तुमचं भलं त्याचं ठिकाणी पंकजा नतमस्तक होणार.लोकांच्या मनातल्या काहुराचे उत्तर मी अनेक दिवसांपासून शोधतेय.माझी आईची भुमिका आहे त्यामुळे मला लेकराच्या हिताचं बघावंच लागेल.तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. माझा अपमान तो तुमचा आपमान आहे. त्यामुळे स्वाभिमान गहाण ठेवणार नाही.आता आपण निवडणूकीत पडणार नाही तर सर्व सामान्यांच्या हिताविरुद्ध काम करणारांना पाडायचं.मी मैदानात उतरणार आहे. नितिमित्ता, चारित्र्य संपन्न नेतृत्व घडवण्यात आयुष्य खर्च करणार असुन स्वाभिमान मरु देणार नाही.मी मैदानात आहे. शिवशक्ती परिक्रमेत जिथे जाता आले नाही त्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी लवकरच दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        आपण गोपीनाथ गड तीन महिन्यातच बनवला पण, आता दहा वर्षे झाली तरी, सरकारकडून मुंडे साहेबांचं स्मारक बनलेलं नाही. आता बनवूही नका. आता जर काही बनवायचं असेल तर, शेतकऱ्याचे कष्ट दूर करणारी जादूची कांडी बनवा. माझ्या ऊस तोड कामगाराच्या कामाचं काहीतरी करा. महिलांचा सन्मान, भ्रष्टाचारमुक्त, व्यसनमुक्त समाज , बेरोजगारी,वंचितांना न्याय आणि जातीपातीच्या भिंती तोडणारी धोरणं बनवा  असे यावेळी पंकजाताई मुंडे यांनी सूचित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार