लघु उद्योगासाठी पुरस्कार योजना

 लघु उद्योगासाठी पुरस्कार योजना

           बीड,  (जिमाका)  दि.10: जिल्हास्तरावर लघुउद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघुउद्योग घटकांना सन 2023 चे जिल्हा पातळीवरील प्रथम व द्वितीय जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म लघुउद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात आले असून निवड केलेल्या उद्योग घटकास्मृतिचिन्ह व प्रथम पुरस्कारासाठी रुपये 15 हजार आणि द्वितीय पुरस्कारासाठी रुपये  10 हजार रोख रक्कम पालकमंत्री यांच्या हस्ते उत्तेजनार्थ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी खालील अटीची पूर्तता करणाऱ्या लघुउद्योग घटकांनी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बीड यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज पुढीलप्रमाणे कागदपत्रासह सादर करावेत.


       उद्योग घटक मागील तीन वर्षापासून नियमित उत्पादनात असणे आवश्यक आहे. लघुउद्योग घटकांचे पाच वर्षांपूर्वी स्थायी लघुउद्योग नोंदणी केलेली असावी, मागील तीन वर्षांमध्ये घटकास सातत्याने नफा (प्रॉफिट) झालेला असावा व रोजगार निर्मितीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, लघुउद्योग घटकास यापूर्वी कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नसावा, उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान अवलंबिलेल्या घटकास प्राधान्य राहील. सन 2023 करिता जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र बीड यांच्याकडे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे. बीड जिल्ह्यातील लघुउद्योजकांनी सदर योजनेच्या अर्जासाठी व याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, बशिरगंज बीड, दूरध्वनी क्रमांक 02442-222285  आणि didic.beed@maharashtra.gov.in या ई-मेल आयडी यावर संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बीड यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !