बीडमध्ये परिस्थिती निवळली, संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

 बीड जिल्ह्यातील संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती


बीड.....

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आज दिवसभर जिल्ह्यात संचारबंदी होती. यावेळी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्ह्यातील वातावरण आता निवळलं आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीत उद्या सकाळी सहा वाजेपासून शिथिलता देण्याचा निर्णय घेतलाय. पण अद्यापही इंटरनेटबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
            बीडमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे आज दिवसभर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता देण्यात येणार आहे.बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत माहिती दिली. “उद्या सकाळी 6 वाजता संचारबंदीत शिथिलता केली जाईल. पण जिल्ह्यात जमावबंदी लागू असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बीड जिल्हा उद्यापासून पूर्वरत होणार”, असंही जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.

‘शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू होतील’

“उद्या सकाळी सहा वाजता संचारबंदी शिथिल होणार आहे. मात्र जमावबंदी राहणार आहे. पाच पेक्षा जास्त जणांना एकत्रित येणे बंदी असेल. सर्व शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू राहतील. इंटरनेट सुरू करण्याबाबत उद्या निर्णय घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.

‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार’

“कोणीही आरोप केले तरी आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार. तोडफोड आणि जाळपोळ झाल्यामुळे संचारबंदी लावावी लागली. संचारबंदीमुळेच उद्रेक कमी झाला”, असं जिल्हधिकाऱ्यांनी सांगितलं. “सीसीटीव्ही पाहून जो ट्रेस होईल त्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. नागरिकांनी शांतता राखावी, कायदा कोणीही हातात घेवू नये”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !