इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

बालाघाट हाफ मॅराथॉन स्पर्धेत कु. निकीता म्हात्रे व कु. अश्विनी जाधव यांना सुवर्ण पदक

 बालाघाट हाफ मॅराथॉन स्पर्धेत कु. निकीता म्हात्रे व कु. अश्विनी जाधव यांना सुवर्ण पदक



सिरसाळा (वार्ताहर):- योगा प्रतिष्ठान, तिरुमला ऑईल आणि कुटे ग्रुप बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बालाघाट हाफ मॅराथॉनचे आयोजन आज दी. २९ ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आले होते. या मॅराथॉन स्पर्धा *२१ कि.मी. आणि १०  की. मि.* आशा दोन प्रकारात घेण्यात आल्या.

२१ कि.मी. मॅराथॉन स्पर्धेत *कू. निकिता म्हात्रे* (बी ए द्वितीय वर्ष) आणि १०  कि.मी. मॅराथॉन स्पर्धेत *कू. आश्विन जाधव* (बी एस सी द्वितीय वर्ष) श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालय सिरसाळा च्या या दोन्ही *मुलींनी अनुक्रमे प्रथम क्रमांक* पटकावला.

यांना योगा प्रतिष्ठान, तिरुमला ऑईल आणि कुटे ग्रुप बीड यांच्या तर्फे अनुक्रमे ११००० रूपये रोख आणि सायकल बक्षीस म्हणून देण्यात आले.

 त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम , सचिव, योगेश  कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!