वाळू माफियांचा मुजोरपणा चव्हाट्यावर

 पोलिस अधीक्षक पथकावर हल्ला 




गेवराई.......

बीड जिल्ह्यात वाळू माफियांना सळो की पळो करून सोडणारे पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व एका पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली. एसपींच्या पथकावरच थेट असा हल्ला करण्यात आल्यामुळे वाळू माफियांचा मुजोरपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


आज पहाटे गणेश मुंडे व पोलीस कर्मचारी श्री. वायबसे हे  गेवराई तालुक्यातील म्हाळसपिपंळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. यावेळी सकाळी 6 च्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची स्कर्पिओ बिनानंबरची थांबलेली होती. सदर गाडी गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. राक्षसभुवन फाट्यावर मुंडे यांनी त्या स्कर्पिओला हात दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीने दिलेल्या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे.. सदर प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे कळते. दरम्यान गणेश मुंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येतं असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार