तेली समाजाने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव उपक्रम स्तुत्य-चंदुलाल बियाणी

तेली समाजाने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव उपक्रम स्तुत्य-चंदुलाल बियाणी


परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)

           महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शहरात विविध उपक्रम राबवणे आवश्यक असून दांडिया सारख्या उपक्रमांची आवश्यकता असून तेली समाजाने सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे केलेले आयोजन स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन चंदुलाल बियाणी यांनी केले.

        येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षी पासून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्षे आहे. या दांडिया महोत्सवात गुरुवारी (दि.१९) मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा बन्सलचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चंदुलाल बियाणी यांनी सांगितले की, महिलांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असते. तेली समाजाच्या वतीने सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे जे आयोजन केले आहे. हा स्तुत्य उपक्रम असून अशाच पध्दतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. व दांडिया महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी संयोजक युवानेते पवन फुटके,राधाताई फकिरे,शिवशंकर जठार, नागनाथ भाग्यवंत, प्रा.प्रवीण फुटके,राहुल क्षिरसागर,सोमनाथ वाघमारे,राजकुमार भाग्यवंत,अशोक रोकडे,रवी अन्नपूर्णे,जयवंत कौले,सचिन लासे,शंकर कौले, ओंकार नाईक आदि उपस्थित होते. यावेळी श्रध्दा हालगे व सुजाता फुटके यांच्या निवेदनाने दांडियात रंगत आणली. दांडियास शहरातील महिला भगिनी व विशेष म्हणजे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी इतर राज्यातील महिलाही दांडिया मध्ये सहभागी होवून आनंद घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार