लढा गरजवंतांचा -पाठिंबा अन्य समाजघटकांचा

मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा


पाथरी, प्रतिनिधी.....
            गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता ब्राह्मण समाजातूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव पुढे येत असून पाथरी तालुक्यातील रत्नेश्‍वर रामपुरी (खुर्द) येथील ब्राह्मण महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला  आहे.
        मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे. याचअनुषंगाने पाथरी तालुक्यात मराठेत्तर ब्राह्मण समाजबांधवांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे येत पाठिंबा दिल्याचे उदाहरण समोर आले आहे. रत्नेश्वररामपुरी (खुर्द) येथील उपसरपंचपदी असलेल्या सौ. अर्चना रामराव मुळी यांनी जनभावना लक्षात घेता व मराठा समाज आरक्षण लढाईला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.



          एवढेच नाही तर रत्नेश्वर रामपुरी ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्यांनीही आपला राजीनामा सादर केला आहे. याबाबतचे सह्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पाथरी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर उपसरपंच सौ अर्चना रामराव मुळी यांच्यासह अन्य सहा ग्रामपंचायत सदस्य उषा भास्करराव चव्हाण, महेश नारायणराव चव्हाण, सतीश पंडितराव रणेर, दिनकर नारायणराव नन्नवरे, सुलोचना बालासाहेब भरकड, रिहाना कबीर खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !