अहमदपूर येथे 20 व 21 जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य संमेलन

 लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड.उषा दराडे


अहमदपूर येथे 20 व 21 जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य संमेलन


बीड प्रतिनिधी

नवव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथा लेखिका अँड. उषा दराडे यांची निवड झाली आहे. सदरील साहित्य संमेलन हे 20 व 21 जानेवारी 2024 मध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे होणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांनी दिले.

मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यातील लेखिकांना व्यक्त होण्यास अधिक संधी मिळावे म्हणून सन 2009 पासून लेखिका साहित्य संमेलनाचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आहे. परिषदेने पहिले संमेलन कथा कादंबरीकार अनुराधा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली घेतले होते.त्यानंतर परभणी, बीड, जालना, धाराशिव, माजलगाव आदी ठिकाणी संमेलने पार पडली आहेत. यावर्षी नववे संमेलन अहमदपूर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड उषा दराडे यांची निवड झाली आहे. त्यांचे आभाळाच्या आरपार, स्वप्नांचा झुला, कुंकवाच्या पलीकडे आणि घायाळ दंश हे चार कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी लग्नाचा धुमधडाका या चित्रपटातही काम केलेले आहे.अँड. उषाताई दराडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष असून त्यांनी विधान परिषदेवर माजी आमदार म्हणून सहा वर्ष विविध विषयांवर अभ्यासपूर्ण सभागृहात कामकाज केलेले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केलेले होते.

अँड. उषाताई दराडे यांच्या निवडी दरम्यान मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे व कोषाध्यक्ष कुंडलिक आतकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर

या संमेलनाचे निमंत्रण अहमदपूर येथील कॉ. श्रीनिवास काळे प्रतिष्ठान आणि मसापची अहमदपूर शाखा या संस्थेच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांनी दिले आहे. माजी आमदार उषाताई दराडे यांचे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार