सन 2024 आणि शासकीय सुट्ट्याही 24

 पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !



मुंबई / प्रतिनिधी 

2024 या पुढील वर्षी राज्य शासनाकडून तब्बल 24 शासकीय सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमस या दरम्यान या सुट्या असतील. पुढील वर्षी दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी आहे.

राज्य सरकारने तब्बल दोन महिने अगोदर पुढील वर्षातील शासकीय सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार, महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार, होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार, गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार, गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार,रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार,रामनवमी १७ एप्रिल बुधवार, महावीर जयंती २१ एप्रिल रविवार,महाराष्ट्र दिन १ मे बुधवार, बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार,बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार,मोहरम १७ जुलै बुधवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार,पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार, गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार,ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार,दसरा १२ ऑक्टोबर शनिवार दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार,दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार,गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार