रविवार 3 डीसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे होणा-या ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 रविवार 3 डीसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे होणा-या ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा




बीड, दि. 20 (जि. मा. का.) : शासकीय योजनाचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या अंतर्गत रविवार दि. 3 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे राज्य  ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार आहे. या होणा-या कार्यक्रमाची आढावा बैठक आज  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे यांनी घेतली.

‘शासन आपल्या दारी’ महत्वाची मोहिम महाराष्ट्र शासन  राबवित असून हा कार्यक्रम बीड जिल्हयात  परळी वैजनाथ तालुका येथे रविवार दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज घेण्यात आली.

          सरकारी योजनांचा लाभ पोहोचविला जावा या हेतूने Ease of Access of Government Schemes (शासकिय योजना सुलभीकरण अभियान) राबविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असुन राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हयामध्ये एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा जिल्हयातील लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबलजावणीः गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानांतर्गत नागरीकांना शासकिय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छत्राखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे.   

             मुख्य कार्यक्रम हा परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे यशस्वी व प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच  योग्य  नियोजन करण्यासाठी  समन्वय साधण्यासाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी बीड त्रिगुण कुलकर्णी व प्रभारी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई शरद झाडगे यांना नेमण्यात आलेले आहे. आज झालेल्या बैठकीत राजशिष्टाचार विषयक, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणाची व्यवस्था, ओळखपत्र वाटप व नियोजन, मंडप व स्टेज व्यवस्था, विविध विभागांकरिता स्टॉल वाटप, लाभार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था,  विद्युत व्यवस्थापन अग्निशमन व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था तस्सम विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.   आज झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी बीड त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह सर्वच विभागातील कार्यालय प्रमुख बैठकीत उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार