श्री मन्मथस्वामी संजीवन समाधी सोहळा निमित्त नागापुर ते कपीलधार 47 व्या पदयात्रेचे परचुंडी येथे भव्य स्वागत

 श्री मन्मथस्वामी संजीवन समाधी सोहळा निमित्त नागापुर ते कपीलधार 47 व्या पदयात्रेचे परचुंडी येथे भव्य स्वागत



परळी/प्रतिनिधी

कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त दरवर्षी नागापुर ते श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रा आयोजित करण्यात येते. यावर्षी 47 व्या वर्षीही ही परंपरा अखंडीत चालू असून श्री गुरू ष.ब्र.108 राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्राम दैवत श्री नागनाथ मंदिर नागापुर येथुन (ता.21) सकाळी 10:00 वाजता प्रारंभ झाला .परचुंडी येथे दुपारी पदयात्रेचे आगमन झाले यावेळी श्रीगुरु शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांचे स्वागत करण्यात आले , वैधकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल ची बसवलिंग देवराव पत्रवाळे याचाही सत्कार श्रीगुरूंच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रेसफोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे,सरपंच मीना गुरूलिंग नावंदे,लक्ष्मणआप्पा नावंदे,वैजनाथ पत्रवाळे, वसंतअप्पा नावंदे, देवराव पत्रवाळे,गणपतआप्पा नावंदे,दिपक नावंदे सर,जनार्दन नावंदे सर,माणिकआप्पा नावंदे,प्रेसफोटोग्राफर गणेश पत्रावाळे ,सुभाष पाटील,कुंडलिक पत्रावाळे, सुभाष नावंदे यांच्यासह विरशैव समाज परचुंडी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !