श्रीपंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींचे मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

 श्रीपंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींचे मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश



सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि नवगण शारीरिक शिक्षण महविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३०-३१ ऑक्टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन *'ब' झोन* मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन नवगण शारीरिक शिक्षण महविद्यालय, बीड येथे संपन्न झाले.

या मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींनी  घवघवीत यश संपादन केले.

या मध्ये *कु अश्विनी जाधव* (बिएसी द्वितीय) हिने अनुक्रमें १५०० मीटर व ५००० मीटर धावणे या दोन्हीं मैदानी क्रीडा प्रकारात *प्रथम* क्रमांक पटकावला. तर *कू रितू राठोड* (बि एस सी तृतीय) या विद्यार्थिनीने ५००० मीटर, ८०० मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही मैदानी क्रीडा स्पर्धेत *द्वितीय क्रमांक* पटकावला आणि ८०० मीटर धावणे स्पर्धेत *कू निकीता* म्हात्रे (बी ए द्वितीय) हिने *प्रथम* क्रमांक पटकावला. तसेच *कू प्रगती पोटभरे* (बी एस सी प्रथम) या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी थाळी फेक स्पर्धेत *प्रथम* व गोळा फेक स्पर्धेत *तृतिय* क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

 या मुलींच्या संघास क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

मुलींच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम उपाध्यक्ष श्री नंदकिशोर सारडा, सचिव, योगेश  कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, डॉ ए डी टेकाळे, डॉ विठ्ठल भोसले, प्रा दयानंद झिंजुर्डे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !