महारेशिम अभियानास जिल्हाधिकऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

 महारेशिम अभियानास जिल्हाधिकऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

        बीड, दि. 21 (जि. मा. का.) : बीड जिल्हा रेशिम उद्योग राज्यात आघाडीवर आहे. रेशिम उद्योगला कमी पाणी लागत असल्यामुळे हा उद्योग जिल्ह्यात अधिक  मोठया केला जाऊ शकतो असे प्रतिपादन  जिल्हाधकारी दीपा मूधोळ मुंडे यांनी महारेशिम अभियानाच्या उद्घाटना प्रसंगी केले.

यावर्षी देखील 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत महारेशिम अभियान राबविण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी रेशिम रथास हिरवी झेंडी दाखवून महारेशिम अभियानास सुरुवात केली. 

      रेशिम संचालनालयाकडून दरवर्षी महारेशिम अभियान राबवले जाते यामध्ये गावोगावी रेशिम रथाच्या माध्यातुन रेशिम उद्योगाविषयी जनजागृती बैठका घेवुन रेशिम शेतीचे महत्व देऊन रेशिम शेतीविषयी प्रवृत्त केले जाते.

    या उद्घाटनाच्या  प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोकाटे, रेशिम विकास अधिकारी एस. बी. सराट, रेशिम विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी व्ही. एस. तोंडे, ए.ए. कुटे, के.एम. राठोड, श्री. बावने, श्री पाटील व नरेगाचे तांत्रिक कर्मचारी श्री. म्हसके,श्री शेळके, मिर्झा राठोड, नागरगोजे शिरसाठ, प्रगतशील शेतकरी, नर्सरी उद्योजक श्री पिसाळ, चौकीधारक श्री नवले व बजगुडे तसेच रेशिम धागा उद्योजक श्री. प्रविण थोरात व इतर शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 


        जिल्हाधिकारी यांनी सर्व शेतकरी व उद्योजकासोबत चर्चा करुन रेशिम उद्योग कमी पाण्यावर होणारा उद्योग असून बीडच्या भौगोलिक परिस्थितीस अनुरुप असल्याने बीड जिल्हा रेशिम उत्पादनात प्रथम क्रमांकावर आणायचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

यावर्षीच्या 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होणा-या महारेशिम अभियानात सहभाग नोंदवुन तुती लागवडीकरिता नोंदणी करण्याचे शेतक-यांना आवाहन त्यांनी यावेळी केले. 

    जिल्हयात कोष खरेदी बाजारपेठ झाल्यामुळे रेशिम शेतक-यांना कर्नाटक राज्यात कोष विक्रीसाठी जावे लागणार नाही. 

कोषाचे दर रु. 45,000  ते 55,000 प्रती क्किंटल असल्याने वर्षातुन 4 बॅचेस मधून रु. 1,50,000 ते 2,00000 प्रति दर हमखास उत्पन्न मिळते. सदरची योजना मनरेगामध्ये समाविष्ट असल्याने तीन वर्षात 4 लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातुन देय आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !