सावधान! सायबर सेलची करडी नजर:सोशल मीडियाचा सजग वापर करा

 सावधान! सायबर सेलची करडी नजर:सोशल मीडियाचा सजग वापर करा



      बीड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलिस ठाणे परळी शहर हद्दितील  सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मीडियाचा वापर समाज हितासाठी करावा.समाजामध्ये अशांतता किंवा कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या, धर्माच्या, भावना दुखावतील किंवा दोन समाजात तेढ किंवा वैरभाव निर्माण होईल अशा प्रकारचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करू नये, लाईक करू नये किंवा शेअर करू नये.सोशल मीडियावर सायबर सेल नजर ठेवून आहे. कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारची पोस्ट केल्यास त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेसह इतर कठोर कायद्याने गुन्हा नोंद करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.


  ▪️ रवी सानप.

 पोलीस निरीक्षक, पो.स्टे.परळी शहर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !