दीपक रनणवरे ब्राह्मण समाजाची ' वज्रमुठ ' जालन्यामध्ये बांधणार!

 आर्थिक निकषावर आरक्षण मिळविण्यासाठी ब्राह्मण समाज जालन्यामध्ये एकवटणार!



दीपक रनणवरे ब्राह्मण समाजाची ' वज्रमुठ ' जालन्यामध्ये बांधणार!

..........

नांदेड दिनांक 25 नोव्हेंबर प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण आरक्षणाच्या प्रश्नावरून ढवळून निघत असताना मराठवाड्यातील ब्राह्मण समाज आर्थिक निकषावर आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मराठवाड्यातील ब्राह्मण समाज आर्थिक हालअपेष्टा सहन करत आहे. समाजातील तरुण उच्चशिक्षित असूनही नोकऱ्या मिळत नसल्यामुळे बेरोजगारीचे भयावह संकट या समाजावर घोंगावत आहे. ब्राह्मण समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी गृहीत धरल्यामुळे या समाजाची सामाजिक व राजकारणातील स्थिती खालावलेली आहे.

सध्या महाराष्ट्रात विविध जाती जमाती आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. राष्ट्रात सध्या मराठा समाजासह धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असल्यामुळे ओबीसी समाज देखील महाराष्ट्रात  रस्त्यावर आले आहेत. तसेच कोळी बांधवही आरक्षण मागत आहेत. आतापर्यंत ब्राह्मण समाज हा कोणत्याही सवलती मागण्यासाठी रस्त्यावर आलेला दिसत नव्हता. मात्र आता महाराष्ट्रतील ब्राह्मणांनीही दंड थोपटत संघर्ष समिती स्थापन केली असून येत्या २८ नोव्हेंबर पासून जालना येथे दीपक रणनवरे यांच्या आमरण उपोषणाने आंदोलनाला सुरुवात केली जात आहे. यापूर्वी मराठवाड्यात ब्राह्मण समाजाच्या ऐक्यासाठी जालना, परभणी, पुणे येथे ब्राह्मण अधिवेशन घेण्यात आले होते. यातून ब्राह्मण समाजाचे सध्याची राजकीय क्षेत्रातील स्थान, समाजाला भेडसावणारे प्रश्न तसेच आर्थिक परिस्थिती यावर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर मात्र ही चळवळ थंड झाली होती. पुन्हा एकदा ब्राह्मण समाजातील नेतृत्वाने आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एल्गार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून ब्राह्मण समाजाची अभेद्य वज्रमुठ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

भारतात ब्राह्मण ही एक उच्चवर्णीय जात म्हणून मानली गेली आहे. प्राचीन काळात या जातीलाच वेदविद्या अभ्यास करण्याचा अधिकार दिला जात होता. त्यामुळे ही एक प्रगत जात म्हणून मानली जात होती. कालांतराने सर्वच जातीतील काही लोक हे आता प्रगत झालेले आहेत. त्यामुळे फक्त ब्राह्मणांचाच अधिकार आहे हा मुद्दा निकालात निघाला आहे. आज महाराष्ट्रापुरते बोलायचं झाल्यास ब्राह्मण समाज हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जेमतेम साडेतीन टक्के असल्याचे बोलले जाते. म्हणजे तसा विचार करता हा अल्पसंख्यांक समाज मानता येईल. मात्र इतकी वर्ष हा समाज फारसा कधी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर आलेला दिसला नव्हता. असे असले तरी त्यांच्या समस्या नव्हत्या असे नाही. त्यामुळे आता त्यांच्यातील काही नेत्यांनी पुढे येत समस्त ब्राह्मण संघर्ष समिती गठीत केली असून ब्राह्मण समाजाच्या समस्यांसाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे,

 या आंदोलनात दि. २८ नोव्हेंबर रोजी  जालना शहरात दीपक रणनवरे नामक ब्राह्मण कार्यकर्ते विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आपापल्या गावात वस्तीत आंदोलन करून या आमरण उपोषणाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. समस्त ब्राम्हण संघर्ष समितीने काही ठिकाणी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी स्तरावर शिष्टमंडळे नेऊन आपल्या मागण्यांची निवेदने सादर केली आहेत. त्यात २८

 नोव्हेंबर पासून सुरू करावयाच्या संघर्षाचीशही माहिती देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार ब्राह्मण समाजाने त्यांच्या जवळ जवळ ११ प्रमुख मागण्या आपल्या निवेदनातून मांडल्या आहेत. त्यात ब्राह्मण समाजासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यातून ब्राह्मणांना आर्थिक सहकार्य केले जावे, सर्व ब्राह्मणांना केजी टू पीजी मोफत शिक्षण दिले जावे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मणांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारले जावे, ब्राह्मण तरुण-तरुणींना शिक्षण आणि व्यवसायासाठी ताबडतोब आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिले जावे, पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना दरमहा पाच हजार रुपये  मानधन दिले जावे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये बिना अडचण हस्तांतरित व्हाव्या, ब्राह्मण महापुरुषांना शिवीगाळ करणाऱ्या विरोधात कायदा करून त्यांना शिक्षेची तरतूद करावी, ब्राह्मणांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास ॲट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करता यावी, यासाठी स्वतंत्र कायदा केला जावा, मंदिरांवरील शासकीय नियंत्रण हटवून संबंधितांना मंदिराचा कारभार सोपविला जावा या काही प्रमुख मागण्या आहेत या मागण्या घेऊन हा समाज देखील आता रस्त्यावर उतरला आहे.


आता ब्राह्मण समाजाच्या या आंदोलनाची शासन स्तरावर किती दखल घेतली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्राह्मण समाज हा रस्त्यावर येईलही. मात्र इतर समाजांसारखा सरकारला आणि समाजाला वेठीस धरू शकेल काय याबाबत ब्राह्मण समाजातही साशंकता आहे. जोवर समाज शासनाला धारेवर धरत नाही, तोवर मागण्या कितपत पूर्ण होतील हा खरा कळीचा मुद्दा आहे.


ब्राह्मण समाज हा सुरुवातीपासूनच बुद्धिवंत समाज म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या काळात विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक चळवळींमध्ये ब्राह्मण समाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर अशी अनेक मान्यवरांची नावे इथे सांगता येतील.नंतरही स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण समाजाने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक नररत्ने दिली आहेत

 जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर अशी वैज्ञानिकांची मांदियाळी, पु ल देशपांडे, ग दि माडगूळकर, मधु मंगेश कर्णिक, दुर्गा भागवत अशी मान्यवर साहित्यिकांची यादी, डॉ. चिंतामणराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, दिल्लीमध्ये स्वकृत्वावर ज्यांनी सर्वोच्च स्थान राजकारणात प्राप्त केले ते स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्यासारखे राजकारणी, तर प्रशासनातही आपला ठसा उमटवणारे शरद उपासनी, राम खांडेकर, असे अनेक मान्यवर सांगता येतील

 मात्र असे मान्यवर महाराष्ट्राने दिले असले तरी ब्राह्मण समाजाला आजवर खूप काही मिळाले असे दिसलेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा समाजाचा वरचष्मा राहिल्यामुळे आणि एकूणच इतर समाजांनी स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण समाजाला काहीसे दुर्लक्षित ठेवल्यामुळे गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्ग हा स्वबळावर संघर्ष करतच जगत आलेला आहे. जेमतेम साडेतीन टक्के असतानाही या समाजाने कधी अल्पसंख्यांकांचे आरक्षण मागितले नाही, तर कधी आर्थिक स्थिती चांगली नसतानाही आर्थिक निकषांवर आरक्षणही मागितले नाही. यावेळी प्रथमच हा समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येतो आहे. त्यामुळे शासन स्तरावरच नव्हे तर समाजानेही या जातीच्या नेमक्या वेदना काय आहेत ते समजून घेणे गरजेचे झाले आहे.

एखाद्या समाजाला किंवा गटाला कायम गृहीत धरले जाते आणि त्यामुळे तो समाज कायम दुर्लक्षित राहतो. कधीतरी त्यांच्या संयमाचा बांध तुटतो आणि मग ते समाज रस्त्यावर येतात. सध्याचे मराठा आणि धनगर समाजाचे आंदोलन हे त्याचे अत्यंत चांगले उदाहरण आहेत. यापूर्वी १९९४ साली गोवारी समाजाच्या आंदोलनात ११८ हुतात्मे झाले होते. त्यांच्याही मागण्या आज दुर्लक्षितच आहेत. आता ब्राह्मण समाजही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येतो आहे. शासनाने आणि समाजाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा आणि भविष्यात जाती जातींमध्ये संघर्ष वाढू नये आणि त्याचे पर्यावसान  अराजकात होऊ नये यासाठी वेळीच पावले उचलली जाणे अत्यंत गरजेचे आहे. जालन्याच्या ब्राह्मण समाजाच्या या आमरण उपोषणाच्या लढ्यामध्ये मराठवाड्यातील समाज बांधवांनी महिलांनी व युवकांनी मोठ्या संख्येने तनमन धनाने सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !