युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

शुक्रवारी बीडमध्ये मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग ‍ परिषद

 शुक्रवारी बीडमध्ये मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग ‍ परिषद


        बीड दि. 22, (जिमा का) : उद्योग संचनालय यांच्यावतीने मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग परिषद शुक्रवारी हॉटेल ग्रँड यशोदा,बार्शी रोड येथे आयोजीत करण्यात आली आहे.या परिषदेसाठी नोंदणी सकाळी 9.30 ला सुरूवात होणार. या परिषदेचे महत्व सांगुन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे या बीड जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग (एमएसएमई) यांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील रोड मॅप वर बोलतील.


    यासह मान्यवर व्यक्तयांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन होईल. सदर परिषद सांयकाळी 5.30 पर्यंत चालेल. अधिकाधिक भावी उद्योजकांनी या परिषदचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या