इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

कार्तिक पोर्णिमेनिमित्त परळी ते कपीलधार जादा बस सोडा-चेतन सौंदळे

 कार्तिक पोर्णिमेनिमित्त परळी ते कपीलधार जादा बस सोडा-चेतन सौंदळे


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 

  श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी - वैजनाथ येथून कपीलधार(मांजरसुंभा) येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीदर्शन व यात्रेनिमित्त जाणा-या व येणा-या भाविक-भक्तांसाठी अधिक(ज्यादा) बसेसची सोय करण्याची मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने  राज्य परीवहन परळी आगारप्रमुख श्री.संतोष महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 कार्तिक पोर्णिमादिनी श्री.संत मन्मथ स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता महाराष्ट्रसह ईतर राज्यातून लाखो भाविक-भक्त दर्शनासाठी श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी-वैजनाथ येथून श्री.संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्यासाठी कपीलधार किंवा तेथून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करण्याकरिता परळी येथे येतात त्यांच्या प्रवासाच्या सोयीकरिता अधिकच्या बसेस या दोन्ही तसेच विविध ठिकाणाहून सोडण्याची मागणी करण्यात आली.

    तसेच प्रत्येक पोर्णिमेनिमित्त कपीलधार तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी,भक्तीस्थळ, अहमदपुर येथे थेट बससेवा सुरू केल्याबद्दल बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,बीड रा.प.विभाग नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.संतोष महाजन यांच्यासह परळी रा.प.विभागातील सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व समाधान भाविक-भक्त तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे,  रामेश्वर कस्तुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!