बीड तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत
बीड (जिमाका)
बीड जिल्हृयातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर झाला असून कालबध्द कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड उपविभागातील संबंधित गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर करावयाचे आहे.
बीड उपविभागातील बीड,गेवराई आणि शिरुर कासार या तीन तालुक्यामध्ये मिळून एकूण 405 पोलीस पाटील यांची पदे रिक्त असून ज्या गावातील पदे रिक्त आहेत ते विचारात घेवुन लोकसंख्येच्या टक्केवारी आधारे प्रवर्ग निहाय आरक्षण व त्यामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. (रिक्त पदाची यादी उपविभागीय कार्यालय बीड,संबधित तहसील कार्याल, संबधित पंचायत समित व ग्रामपंचायत येथे डकविण्यात आली आहे.)
प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय बीड येथे काढण्याचे निश्चित केले असून पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील नागरीकांनी आरक्षण सोडतीस उपस्थित राहता येईल, असे बीड उपविभागीय कार्यालयाचे, उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा