किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा

 बीड जिल्ह्यातील मुलीं आता खेळणार  'थ्रोबॉल'

किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा

बीड, दि. 03 (जि. मा. का.) :-बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामधील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार. किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी थ्रोबॉल आणि जाळी (नेट) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सुपूर्त केले.

बालविवाहाला नकार देण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता अकरा तालुक्यातील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार.रत्नदीप चॅरिटी ट्रस्टचे राजीव मेहता यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना थ्रोबॉल आणि जाळी (नेट ) भेट स्वरूपात देण्यात आले. 

हे थ्रो बॉल आणि नेट जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना शाळेतील  विद्यार्थिनींना थ्रोबॉल खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांच्या सुपूर्त केले. 

युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन (एसबीसी थ्री) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या संशोधनानुसार थ्रोबॉल हा खेळ खेळल्याने मुलींची शारीरिक प्रकृती  सुदृढ आणि सशक्त होत असल्याच्या निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. त्यासाठीच थ्रो बॉल देण्यात आले आहे.

अधिक सुदृढ आणि सशक्त होईल. त्यांची उंची वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणीत होईल. या सर्वांचा परिणाम  'बालविवाहला नकार' देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करणे हे होय. प्रथम टप्प्यात 125 शाळांना  थ्रोबॉल आणि नेट देण्यात येणार असून उर्वरित शाळांना पुढील टप्प्यात वितरित केले जातील.

थ्रोबॉल आणि नेट ही  सामुग्री प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना यांच्या सुपूर्त करताना अपर निवासी जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सोनिया हंगे,  वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बालविवाह निर्मूलन प्रकल्प- युनिसेफ व एसबीसी थ्री या उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !