पोलीसांच्या निष्क्रियतेवर अभिनव निषेध: पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची साजरी केली वर्षपुर्ती

पोलीसांच्या निष्क्रियतेवर अभिनव निषेध: पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची साजरी केली वर्षपुर्ती



परळी वैजनाथ- मोटरसायकल चोरीच्या घटनेला तब्बल एक वर्ष होऊन गेले तरी अद्याप तपास जिथल्या तिथेच आहे.एका घटनेतच असे नाही तर मोटरसायकल चोरीच्या असंख्य घटनांच्या तपासाची हीच स्थिती आहे.परळी पोलीसांच्या निष्क्रिय तपासला अधोरेखित करण्यासाठी परळीतील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी अभिनव निषेध नोंदवत चक्क पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा वर्षपुर्ती सोहळाच साजरा केला.

   सीसीटिव्ही,पोलीस अशी प्रभावी यंत्रणा असतानाही अनेक मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास लागलेला नाही. अनेक चोऱ्यांपैकी मराठवाडासाथी पीसीएन न्यूजचे संपादक, पत्रकार मोहन भागोजी व्हावळे यांची दुचाकी चोरीस जाउन वर्ष उलटले. यासाठी मागील वर्षभर पोलीसांकडे  पाठपुरावा करुनही दुचाकीचा शोध लागलेला नाही. चोरीस गेलेल्या दुचाकीचा वाढदिवस करून  चोरीस गेलेल्या दुचाकी बाबत  पोलीसांना अभिनव पद्धतीने स्मरण करून देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, विजय जोशी,सचिन स्वामी, वैजनाथ कळसकर, संपादक ज्ञानोबा सुरवसे, मोहन व्हावळे, पत्रकार धनंजय आढाव,प्रकाश चव्हाण, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे,महादेव शिंदे,प्रा.प्रविण फुटके,संजीब राॅय,कैलास डुमणे, श्रीराम लांडगे  आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !