एक पाऊल मागं, आंदोलन सुरु राहील, आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार

गद्दार होऊ शकत नाही म्हणून एक पाऊल मागं, आंदोलन सुरु राहील, आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार : मनोज जरांगे

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे. मराठा

मराठा समाजाला कुणबी ओबीसीची प्रमाणपत्रं देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी २०२४ पर्यंतची वेळी दिली आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण अखेर स्थगित करत असलो तरी राज्यभरात साखळी उपोषण मात्र सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. याशिवाय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. मात्र जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर घरी न जाण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. राज्य सरकारनं दिलेल्या वेळेत आरक्षण न दिल्यास मुंबई जाम करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.


कायद्याच्या कचाट्यात न अडकणारं आरक्षण देणार : धनंजय मुंडे

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आमरण उपोषण स्थगित केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचं आभार मानलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नी गांभीर्यानं काम करत आहेत. राज्य सरकार प्रामाणिकपणे कायद्याच्या कचाट्यात न अडकणारं आरक्षण देण्यासाठी काम करत आहेत. शिंदे समितीला ज्या प्रमाणं २ महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणं मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यासाठी मुदत घेतलेली आहे. जे गुन्हे दाखल होऊन दोन महिने झाले आहेत त्या संदर्भातील गुन्हे मागं घेण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाल्यांचं धनंजय मुंडे म्हणाले.धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं म्हटलं.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचं आभार मानले. राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लवकरात लवकर आरक्षण देण्याची ग्वाही देत असल्याचं म्हटलं.

      मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय न झाल्यास मुंबईच्या सीमेवर जाऊन बसण्याचा इशारा दिला. आज उपोषण स्थगित करत असलो तरी दोन महिन्याच्या कालावधीत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारला आता दिलेला वेळ शेवटचा असल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे. या वेळेत आरक्षण दिलं नाही तर मुंबई जाम करणार असल्याचं म्हटलं. राजकीय, आर्थिक, सामाजिक नाड्या जाम करणार आहे. चार कोटी मराठे मुंबईत जाणार, असल्याचं जरांगे म्हणाले. कायद्याच्या अभ्यासकांशी चर्चा करुन निर्णय घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार