महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आदर्श पोलीस पाटील ज्ञानोबा (माऊली) मुंडे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

 महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आदर्श पोलीस पाटील ज्ञानोबा (माऊली) मुंडे  कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

   परळी तालुक्यातील पांगरी, गोपीनाथ गड गावचे पोलीस पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटने राज्यसम्न्यवयक तथा वैद्यनाथ कारखानाच्या संचालक ज्ञानोबा माऊली मुंडे यांचा अमरावती येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आदर्श पोलीस पाटील कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांना कार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 

             गेल्या अनेक दशकापासून पांगरी गोपीनाथ गड गावचे पोलीस पाटील पद कर्तव्य जबाबदारी व निष्ठेने पार पाडत आहेत. त्यासोबतच राज्य समन्वयक म्हणून सर्व पोलीस पाटील संघटनांना एकत्रित संघटित करून राज्यस्तरावर शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा करीत आहात. वडील भगवानराव व आई गयाबाई या दाम्पत्यांच्या शेतकरी कुटुंबात जन्म घेउन बाळकडू कुटुंबातच मिळून सामाजिक कार्यात स्वतः पूर्ण वेळ झोपून दिले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाटचाल करीत शेतीशी मातीशी व ग्रामीण जीवनाशी घट्ट नाते कायम ठेवत आयुष्याची वाटचाल केली. पदव्युत्तर  एम ए राज्यशास्त्र पऱ्यांचे शिक्षण पूर्ण करून सन २००१ या वर्षापासून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड या गावचे पोलीस पाटील पद व राज्यातील पोलीस पाटील यांचे यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत.त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये बीड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर परळीला भव्य असा मेळावा घेतला. 2006 मध्ये पोलीस पाटलांसाठी विशेष असे कायदेशीर शिबिर आयोजित केले. पांगरी गोपीनाथ गड या गावांमध्ये गाव तंटामुक्त करण्यासाठी तसेच गावात कायम शांतता राहील यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे सण उत्सव अधिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच गावात शांततेच कार्यक्रम पार पडले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच 2015 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राज्यपाल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. २०२१ मध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून पोलीस पाटलांच्या भरती बाबत प्रत्यक्ष निवेदन दिले. राज्यातील पोलीस पाटील यांच्या समस्यासाठी आयुष्यभर लढा देत आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनावर सर्व संघटनांसोबत समन्वयक साधत सर्वांना एकत्रित आणण्याचा यशस्वी प्रयत्न आपण केला आहे. पोलीस पाटील यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अनेक पोलीस पाटील यांना  न्याय मिळवून दिला आहे. राज्यात कुठेही पोलीस पाटलावर अन्याय झाल्यास प्रसंगी राज्याचा दौरा व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस पाटील यांच्यावर अन्याय निवारण्याचे कार्य केले आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार भागवतराव कराड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी आमदार भगवानराव नागरगोजे, व राजकीय पुढार्‍यांसोबत नात्याचे व स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री  आता परळी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार धनंजय मुंडे हे बंधू मानत आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन धनंजय मुंडे हे विरोधी पक्ष नेते असताना सभागृहात पोलीस पाटील यांचा प्रश्न उपस्थित करून मानधन वाढ होण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळामध्ये गोपीनाथ गड पांगरी कोरोना मुक्त राहावा यासाठी त्यांनी विशेष असे प्रयत्न केले. आपली कर्तव्य तत्परता कामात मातीशीलता ठामवृत्ती  परखड वकृत्व उत्कृष्ट संभाषण व संघटन कौशल्य प्रेरणादायी आहे. आपले कार्य व कर्तव्य आयुष्यभर पोलीस पाटील यांना न्याय मिळावे या उद्दिष्टाने प्रेरित होऊन कार्य करीत असल्याने आपणास व आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना व सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष श्री राहुल उभे पाटील व सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व समस्त पोलीस पाटील अमरावती जिल्हा यांनी दिली आहे.   

          महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना व सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श पोलीस पाटील  ज्ञानोबा माऊली मुंडे  "कार्य गौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !