युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कु प्रांजल बोधक कलारत्न पुरस्काराने सन्मानित

 कु प्रांजल बोधक कलारत्न पुरस्काराने सन्मानित



दि 19-11-23 सोलापूर येथे, शाहीर सिद्राम भोसले,""कलारत्न"पुरस्कार 2023 सोलापूर,सिने अभिनेता अली खान सर,डी सी पी.काळे मॅडम सोलापूर,यांच्या हस्ते कु प्रांजल बोधक स्टार प्रवाह हिला अनेक दिगग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत,कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अत्यंत कमी वयात,,स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार, छोटे उस्ताद या रियालिटी शो च्या माध्यमातून, संपूर्ण महाराष्ट्रात, घराघरात पोचलेली,कु प्रांजल बोधक हिने आपल्या जादुई आवाजाने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली. परभणी च्या सांस्कृतिक क्षेत्रात,स्वतः चं आणि परभणी जिल्ह्याचे नावं ती उज्वल करत आहे,संपूर्ण परभणीकरांनी तिला शुभेच्यांचा वर्षाव केला.

 या वेळी,ख्यातकीर्त संगीतकार चंदन कांबळे पणे,इंडियन आयडॉल फेम चैतन्य देवडे,शाहीर रामानंद उगले,गायिका स्वरलक्ष्मी लहाने,आयोजक रवी भोसले,विनोद भोसले,संगीतकार जब्बार मुर्शद,धनंजय,असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत, हा सोहळा पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या