परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
कार्तिकी वारीत सुरक्षेसाठी क्यूआर कोडचा प्रथमच वापर
४५०० हून अधिक पोलिसांची पंढरपूरवर नजर
पंढरपूर: कार्तिकी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात येणाऱ्या पोलिसांना क्यूआर कोडसाठी कार्ड देण्यात येणार आहे. कार्डच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांची त्याच ठिकाणावरून हजेरी घेण्यात येईल. त्यांना ऑनलाइन पद्धतीने सूचना मिळतील. पोलिस कर्मचाऱ्याच्या 'लोकेशन'ची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांना कळेल. यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली. कार्तिकीसाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी ४४५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहितीही डॉ. भोसले यांनी दिली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी पंढरपूर शहरातील विविध ठिकाणची पाहणी केली. या वेळी पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्तिकी एकादशीनिमित्त शहरात लाखो भाविक येणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.
*यात्रेसाठी असा आहे पोलिस बंदोबस्त*
• पोलिस अधीक्षक : ०१
• अप्पर पोलिस अधीक्षक : ०१
• पोलिस उपाधीक्षक : १३
• पोलिस निरीक्षक : २८
• सहायक पोलिस निरीक्षक : ११३
• पोलिस कर्मचारी : ३०००
होमगार्ड : १२००
वाहतूक पोलिस कर्मचारी एसआरसीपी पथक : ०२
क्यूआरटी पथक : ०१
एसआरपीएफ कंपनी : ०१
बीडीडीएस पथक : ०१
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
उत्तर द्याहटवा