श्रीक्षेत्र कपिलधार कडे निघालेल्या विविध दिंड्यांचे वैद्यनाथ मंदिर परिसरात जोरदार स्वागत

 श्रीक्षेत्र कपिलधार कडे निघालेल्या विविध दिंड्यांचे वैद्यनाथ मंदिर परिसरात जोरदार स्वागत






परळी/प्रतिनिधी

येथे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात श्रीक्षेत्र कपिलधार येथील मन्मथ माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंड्यांचे आज आगमन झाले. गडगा,बीचकुंदा ,वेलुर व इतर ठिकाणचे भाविक दाखल झाले आहे. विविध ठिकाणच्या पायी दिंडीतील भाविकांनी वैद्यनाथ मंदिरासमोर हर हर महादेव ,श्री मन्मथ स्वामी की जय घोष करीत रिंगण सोहळा केला.फटाक्यांची आतिषबाजी करीत बीचकुंदा (तेलंगणा) येथील पायी दिंडीतील भाविकांनी पाऊले खेळल्याने भक्तीमय वातावरण तयार झाले..या दिंडीचे चंद्रकांतआप्पा बुरांडे यांनी स्वागत केले.  शिवाचार्य महाराजांसह भक्त हर हर महादेव, गुरूराज माऊली, श्री मन्मथ स्वामी की जय अशा घोषणा देत वैजनाथ मंदिरात पोहोचले व प्रभू वैद्यनाथाचे त्यांनी दर्शन घेतले .पदयात्रेत प्रत्येकाच्या गळ्यात भगवा रुमाल व झेंडा होता,

यावेळी प्रवीण थोटे , सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, पत्रकार संजय खाकरे,  संदीप चौधरी, सदानंद चौधरी, सोरडगे, नंदकिशोर शेटे, नाईकवाडे, कैलास भिमाशंकरअप्पा रिकीबे, गोदावरी चौधरी, सौ.चेतना गौरशेटे व इतर भाविक उपस्थित होते. यावेळी आरती झाली. विविध ठिकाणच्या दिंडीतील भाविकांनी श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. श्री वैद्यनाथमंदिर परिसरातील व्यापार्‍यांनी ही दिंडीचे स्वागत केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार