‘अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’ आणि बार्टीपुणे यांचे सयुक्त विद्यमाने मेळावा उत्साहात

 ‘अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’ आणि बार्टीपुणे यांचे सयुक्त विद्यमाने मेळावा उत्साहात 



बीड (जि. मा. का.) 

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) आणि साहित्यरत्न लोकशाहीर मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी आणि मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळपर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता योजनांचा प्रचार, प्रसार व जास्तीत जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा लातुर व जिल्हा बीड येथील  मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, शिवनेरी गेट समोर,डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड,लातुर येथे मेळावा संपन्न झाला.

मेळाव्यात शाहीर  एन.बी कसबे  यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाणे सादर केले. मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष सांगळे व्यवस्थापकीय संचालक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म),मुंबई  होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, म्हणुन उपसित होते.अनिल रा.म्हस्के, महाव्यस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म),मुंबई  हे उपस्थित होते.  मेळाव्यासाठी जिल्हा लातुर व बीड येथील समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रस्ताविक भाषण आर.जी.दरबस्तेवार प्रादेशिक व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), लातुर यांनी करुन  महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.

तद्दनंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ.शिवाजी जवळगेकर, यांचे मार्गदर्शनपर मनोगत डॉ.माधवराव गादेकर, यांचे मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त करुन महामंडळातील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना/विनंती करण्यात आली, तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक डॉ.लक्ष्मीकांत वाघमारे व  नेताजी जाधव यांची त्यांचे यशाबद्दल महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

महामंडळ माजी अध्यक्ष् राम गुंडीले, महामंडळाचे सल्लागार अँङ अंगद गायकवाड व क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाचे माजी उपध्याक्ष दिलीप आगळे  यांनी देखील त्यांचे भाषणामध्ये बऱ्यांच बाबीवर प्रकाश टाकून महामंडळाच्या कामकाजामध्ये  काही बदल करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत, तसेच महामंडळाच्या कार्यात सदैव सोबत राहून महामंडळाच्या अडीअचणी,  राजकीय बाजूने शासन दरबारी मांडणार असल्याची  ग्वाही या प्रसंगी दिली.

प्रमुख पाहुणे  अनिल  रा.म्हस्के, महाव्यस्थापक यांनी आपल्या भाषणामध्ये महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व योजना मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  या प्रचार व प्रसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत सांगण्यात आले. महामंडळमार्फत पुर्वी राबविण्यात येत असलेलया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजने मध्ये बदल करुन देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच  एनएसएफडीसी योजना  व त्यासाठी आवश्यक असलेली खंड हमीसाठी  मिळण्यासाठी  व  सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजनां प्रभावी पणे सुरु राहण्यासाठी  शासन दरबारी  पाठपुरावा सुरु असल्याबाबत माहिती दिली.  तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठयाप्रमाणात घेण्याचे अहवान श्री.अनिल म्हस्के, महाव्यवस्थापक यांचेमार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण मा.श्री.मनिष सांगळे, व्यवस्थापकीय  संचालक यांनी केले, या भाषणामध्ये  त्यांनी महामंडळाचा पदभार स्विकारल्यापासून केलेल्या कामाजाचा आढावा सादर केला. तसेच लाभार्थींनी योजनांचा लाभ घेण्यासाठी  व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्य पुर्ण व्यवसाय निवडीबाबत अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले, तसेच महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाने महामंडळास ता.तुळजापूर,जिल्हा धाराशिव येथे  उपलब्ध करुन दिलेल्या जमिन/जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या  युपीएससी/ एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी  प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना मौल्यवान  मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठयाप्रमाणात घेण्याचे अहवान श्री.मनिष सांगळे, व्यवस्थापकीय संचालक  यांचेमार्फत करण्यात आले

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एल.एल.क्षिरसागर,जिल्हा व्यवस्थापक,धाराशिव यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी सांळुके, सहशिक्षक, लाल बहादुर शास्त्री विद्यालय,लातुर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !