एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा

 एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या रविवारी  नरेंद्र जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.यादैदिप्यमान यशाबद्दल  सकल ब्राह्मण समाजाकडून रविवार दि. २४ डिसेंबर सकाळी ११:०० वाजता स्व.मनोहरपंत बडवे सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर,देशपांडे गल्ली येथे चि.नरेंद्र मनोहर जोशी यांचा 'कौतुक सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सकल ब्रह्मवृंद, आप्तेष्ट,स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!